नगर परिषदेचे कर्मचारी तसेच पोलिसांनी हा भरलेला आठवडी बाजार हुसकावूनही लावला; मात्र पुन:पुन्हा बाजार भरत असल्याने व भरणाऱ्या बाजारामुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. यातही फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडण्याची परवानगी असतानाही; इतर दुकाने बंदचे आदेश असतानाही शहरातील व ग्रामीण भागांतील दुकानदार व व्यापारी आपली दुकाने सर्रासपणे उघडून बसत आहेत. तसेच शहरात भरणारा आठवडी बाजार बंदचे आदेश असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून बुधवारी येथील आठवडी बाजार शहरातील कोल्हेर रोड, नाईकनगर, सावतानगर, ताकडगाव रोड, मोढा नाका, राज गल्लीसह विविध ठिकाणी भरत आहे.
भाजीपाला, फळविक्रेते, चिवड्याची दुकाने तसेच इतर साहित्याची दुकाने भर रस्त्यावर थाटून बसत आहेत. हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती. यावेळी व्यापारी तसेच नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हते. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. हा भरलेला बाजार सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड, नगर परिषदेचे अधिकारी व्ही. टी. तिडके, वाघ, भागवत येवले, पोलीस रंजित पवार, गणेश नांगरे यांनी उठवून लावला; मात्र तरीही बुधवारी हा बाजार भरत असल्याने व गर्दी होत असल्याने कोरोना रोग वाढल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होते आहे. तरी या भरणाऱ्या बाजारकडे नगर परिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन आठवडी बाजार भरणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
शहरातील कोल्हेर रोड, नाईकनगर, ताकडगाव रोड, मोढा नाका, राज गल्ली, सावतानगर या भागांत बाजार भरत आहे.
या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिक व व्यापारी यांच्या तोंडाला मास्क नव्हते.
या भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यांवर वाहनांची गर्दीच गर्दी होत आहे.
===Photopath===
280421\20210428_115313_14.jpg~280421\20210428_115254_14.jpg