शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
3
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
4
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
5
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
7
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
8
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
9
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
10
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
11
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
12
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
13
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
14
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
15
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
16
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
17
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
18
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
19
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

नुकसान भरपाईच्या अनुदानातून उभारले मंगल कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:31 AM

२२ लाख रुपयांचा लोकसहभाग : धर्मेवाडीत उभारले मंगल कार्यालय माजलगाव : तालुक्यातील धर्मेवाडी गावातील ग्रामस्थांनी शेतीच्या नुकसानीचे ...

२२ लाख रुपयांचा लोकसहभाग : धर्मेवाडीत उभारले मंगल कार्यालय

माजलगाव : तालुक्यातील धर्मेवाडी गावातील ग्रामस्थांनी शेतीच्या नुकसानीचे मिळालेले अनुदान गावाच्या विकासासाठी दिले असून तब्बल २२ लाख रुपयांचा लोकसहभाग जमा करत गावातच अद्ययावत मंगल कार्यालय उभारले आहे. गावातील लग्न सोहळा, मंगल कार्यक्रम, सप्ताह व इतर सार्वजनिक कार्यासाठी या मंगल कार्यालयाचा उपयोग करण्यात येणार आहे. धर्मेवाडी ग्रामस्थांच्या या विधायक कामाची तालुक्यात चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील धर्मेवाडी हे ५०० लोकसंख्येचे गाव. गावामध्ये पूर्वीपासूनच सामाजिक एकोप्याचे वातावरण. गावात विवाहयोग्य मुला-मुलींच्या लग्नासाठी शहरामध्ये मंगल कार्यालय भाड्याने घ्यावे लागत असे. यासाठी मोठा खर्च वधूपित्यास करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. शासनाकडून शेतीच्या नुकसान भरपाईपोटी आलेले १४ लाख रुपये व त्यामध्ये गावकऱ्यांनी अधिकची रक्कम जमा करीत आणखी ८ लाख रुपयांच्या लोकसहभागातून अद्ययावत मंगल कार्यालय उभारले आहे.

एकीकडे दिवसेंदिवस शेतीव्यवसाय अडचणींचा ठरत आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतो. तरीदेखील गावाचा विकास झाला पाहिजे, ही प्रत्येक ग्रामस्थाची भावना होती. शासनाच्या स्वच्छता अभियानास प्रतिसाद देत गावामध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. तर फळांची शंभर झाडे याठिकाणी लावण्यात आली आहेत. दरम्यान, गावातील विवाह व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी हे मंगल कार्यालय धर्मेवाडीच्या ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे.

जेमतेम पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या योजना अत्यल्पच राबविल्या गेल्या. गावाचा विकास झाला पाहिजे. या ध्येयाने प्रेरित होऊन युवक, शेतकरी, कष्टकऱ्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग जमा करीत आज एक आदर्श निर्माण केला आहे.

धर्मेवाडीमध्ये मंगल कार्यालय उभारणी, स्वच्छता अभियान, वृक्षलागवड यासह विविध विकासकामे प्राधान्याने मार्गी लागावीत यासाठी ग्रामस्थांना वेळोवेळी एकत्रित आणण्याबरोबरच त्यांच्यामध्ये समन्वय साधल्यामुळे आज ही कामे मार्गी लागली आहेत.

- पांडुरंग चांडक, ग्रामस्थ.

अद्यायावत उभारण्यात आलेल्या या मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला तर श्री संत माऊली मंदिराचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. यानिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.