शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

शहीद परमेश्वरने दिला मित्रप्रेमाचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:38 PM

युद्ध सरावादरम्यान रणगाडे हलविण्याचे प्रशिक्षण सुरु होते. सहकारी मित्र हा रणगाड्याखाली जाताना वाचवा, वाचवा अशी हाक देत होता. त्याला वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या परमेश्वरच्या डोळ्याच्या वरील बाजुस जबर मार बसताच तो कोसळला. कर्तव्य बजावताना त्याला वीरमरण आले. मित्राचे प्राण वाचवून मैत्रीचा नवा आदर्श त्याने घालून दिला.

ठळक मुद्देयुध्द सरावादरम्यान मित्राला वाचविताना परमेश्वरला वीरमरण : आज घागरवाड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : युद्ध सरावादरम्यान रणगाडे हलविण्याचे प्रशिक्षण सुरु होते. सहकारी मित्र हा रणगाड्याखाली जाताना वाचवा, वाचवा अशी हाक देत होता. त्याला वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या परमेश्वरच्या डोळ्याच्या वरील बाजुस जबर मार बसताच तो कोसळला. कर्तव्य बजावताना त्याला वीरमरण आले. मित्राचे प्राण वाचवून मैत्रीचा नवा आदर्श त्याने घालून दिला.आर्टिलरी फोर्समधील जवान तथा तालूक्यातील घागरवडा येथील परमेश्वर बालासाहेब जाधवर यांना वीर मरण आल्याचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला. प्रत्यक्षात या घटनेची माहिती जाणून घेताना ‘देश असो, नागरिक असो अथवा सोबतचा सहकारी असो, त्याला वाचविण्याचे धाडसी ध्येय उराशी बाळगत सैनिक कामगिरी करतात हा वस्तुपाठ परमेश्वरने युध्द सरावादरम्यान पुन्हा एकदा घालून दिला. युध्दात एखाद्या ठिकाणाहून रणगाडे दुसºया ठिकाणी हलविताना जर दहा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर ते वाहनाद्वारे हलविली जातात. अशा वेळी रणगाडे कशी हलवावीत याचे प्रशिक्षण दिले जात होते.यावेळी परमेश्वरचा सहकारी जवान रणगाड्याखाली जाताना त्याने वाचवा..वाचवा म्हणून हाक दिली तोच परमेश्वर धावत वाचविण्यासाठी त्याच्याजवळ गेला. त्याचवेळी परमेश्वरच्या डाव्या डोळ्याच्या वर जोरदार मार लागला. त्याच्या मज्जातंतूला जोरदार झटका बसल्याने मेंदूचा रक्तस्त्राव बंद झाला आणि परमेश्वरला वीरमरण आले. या घटनेत सहकारी जवान जखमी झाला आहे. जाताना मित्रांसाठी परमेश्वरने आदर्श घालून दिल्याचे सुभेदार अंकुश वळकुंडे म्हणाले. परमेश्वरच्या मेंदूला जोराचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.अंत्यविधी, स्मारकासाठी शेतक-याने दिली जागागुरूवारी दुपारपर्यंत शहीद परमेश्वर जाधवर यांचा मृतदेह घागरवाडा येथे पोहोचेल असा अंदाज असून गावाजवळ असणारी शेतातील जागा मालक भीमराव केरबा नागरगोजे यांनी अंत्यविधी व स्मारक उभारणीसाठी दिली असून तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियोजन केले असून तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी यांनी गावात जाऊन अंत्यसंस्काराच्या ठिकाणाची पहाणी केली. पोलीस यंत्रणेस सुरक्षेबाबत सूचना केल्या.काही तासांपूर्वीच झाले होते बोलणेमूळचे शेतकरी व ऊस तोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे बालासाहेब जाधवर व भाऊ राजेभाऊ जाधवर यांचे संयुक्त कुटूंब घागरवाडा येथे आहे. परमेश्वरचे माध्यमिक शिक्षण उमरी (ता.माजलगाव) येथे तर उच्च शिक्षण पिंपळनेर येथे झाले. १९ नाव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास वडिलांना फोनवर कुटुंबाची खुशाली विचारली. सायंकाळी भाऊ रामेश्वरशी तो बोलला. हेच शेवटचे बोलणे ठरले. यानंतर युद्ध सरावादरम्यान परमेश्वरला वीरमरण आले. रात्री दु:खद वार्ता कानी पडल्यावर घागरवाडा गावावर दु:खाचे सावट पसरले.

टॅग्स :BeedबीडMartyrशहीदSoldierसैनिक