शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मातंग आरक्षण : मागण्या मान्य झाल्याशिवाय संजयवर अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:52 AM

मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गावात तणावाची स्थिती आहे.

बीड : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील बिंदुसरा तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी रात्री उशिरा केज तालुक्यातील साळेगाव येथे आणण्यात आला. तरुणाच्या वारसांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि एका व्यक्तीला नोकरी द्यावी, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात, या व इतर मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गावात तणावाची स्थिती आहे . तसे निवेदन नातेवाईकांनी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना बुधवारी रात्री दिले. आज सकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता. 

तत्पूर्वी, बुधवारी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी भडकलगेट येथे मृतदेह आणून ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक बीडकडे रवाना झाले. एससी आरक्षणात अ, ब, क, ड गट करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी साळेगाव (ता. केज, जि. बीड) येथील संजय ताकतोडे या तरुणाने ५ मार्च रोजी बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून आत्महत्या केली होती. नातेवाईकांच्या मागणीनुसार बीड पोलिसांनी संजयचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात आणले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी तेथे त्यांचे नातेवाईक आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मृतदेह विभागीय आयुक्तालयात न्यावा आणि आपली मागणी लावून धरू असे मत मांडले. विभागीय आयुक्तालयाकडे जात असतानाच भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मृतदेह उतरवून आंदोलन सुरू करण्यात आले.  माहिती मिळताच उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक, राजश्री आडे आदींनी धाव घेतली. खाटमोडे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

केज तालुक्यात अज्ञाताची बसवर दगडफेकदरम्यान,  मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे नेला असतानाच इकडे त्याच्या मूळगावी साळेगाव येथे याचे तीव्र पडसाद उमटले. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी बसवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. साळेगाव येथून बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास केजहून कळंबकडे जात असलेल्या बस(एमएच २० डी ९५२१)वर  कळंबकडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी दगडफेक केली. यामध्ये बसच्या समोरील काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. 

बुधवार रात्रीपासून साळेगावात ठिय्या आंदोलन संजय ताकतोडेंच्या कुटूंबास पंचवीस लाख रुपये देऊन पुनर्वसन करण्यात यावे, कुटुंबातील एकास शासकीय नौकरीस घ्यावे, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्या करत नातेवाईक आणि लहूजी सेनेतर्फे साळेगावात बुधवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या मागण्यांचा ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत संजयवर अंत्यविधी केला जाणार नाही अशी भूमिका कुटुंबातील सदस्यांनी व लहुजी सेनेने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खंदारे यांनी दिली आहे. दरम्यान, याठिकाणी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. सरकारतर्फे मंत्र्यांनी येथे भेट देऊन मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणSuicideआत्महत्याBeedबीड