सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या वतीने मदत होत आहे. मात्र, रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यात विविध साहित्याची कमतरता पडत असल्याने ती कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष अरुण बरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक औषधींचे वाटप केले. यात मेथीलप्रेडणीसोलोने इंजेक्शन २२५ व्हायल, इनॉक्सपॅरिन सोडियम इंजेक्शन १५० व्हायल, विटामिन सी विथ जिंक टॅबलेट १५ गोळ्यांचे २०० पॅकेट, शंभर मि. लिटरचे ४०० सॅनिटायझर अशा एकूण ७० हजार रुपयांच्या औषधी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सी. एस, गीते, महाराष्ट्र केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष अरुण बरकसे, अतुल सानप, श्रीकांत बिदे, गेवराई केमिस्ट संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, सुरेश पवार, ईश्वर मुथा, राजेंद्र बरकसे, महेश दाभाडे, गणेश मिटकर, सुनील सोनी, विजय दायमा, सोमनाथ शिंदे, नारायण हावळे, सचिन शिंदे, संदीप मडके, बाळासाहेब सानप, ॲड. सुभाष निकम, कडुदास कांबळे, आदी उपस्थित होते.
===Photopath===
170521\sakharam shinde_img-20210517-wa0013_14.jpg