लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांच्या बैठकीत २ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक बंद पुकारण्यात आला. येथील द. बा. घुमरे पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांची बैठक संपन्न झाली.विनाअनुदान शाळांना प्रचिलत नियमानुसार शंभर टक्के अनुदान मंजूर करावे, वेतनेत्तर अनुदान १२ टक्के प्रमाणे सर्व शाळांना देण्यात यावे, इमारत भाडे मूल्यांकनानुसार सर्व शाळांना देण्यात यावे, अघोषित प्राथमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान मजूर करावे, शिक्षकेत्तर वाढीव पदाचा आकृती बंध मंजूर करून पद भरतीस मान्यता द्यावी, केंद्राप्रमाणे जशास तसा वेतन आयोग शिक्षण संस्थांतील कर्मचाऱ्यांना लागू करावा, कर्मचाºयांच्या निवड श्रेणीतील जाचक अटी दूर कराव्यात, प्राथमिक शाळांना सेवक लिपिक मान्य करावा, शाळेतील विध्यार्थी वाढीप्रमाणे संच मान्यतेत वाढीव शिक्षक मान्य करावेत, २८ आॅगस्ट २०१५ च्या जीआर प्रमाणे वाढीव सुपरवायझर, उपमुख्याध्यापक पदाना मान्यता द्यावी, २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहेशिक्षण संस्था महामंडळ विभागीय सहकार्यवाह दीपक घुमरे, जिल्हा चिटणीस उत्तम पवार, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. सर्जेराव काळे, अंकुश काळदाते, अजय बुरांडे, चंद्रकांत मुळे, काळे महादेव, के. पी. थिगळे, नामदेवराव क्षीरसागर, माजी आ. डी. के. देशमुख, हनुमंत थोरवे, नियामत बेग, आर. वाय. शिंदे, घुले, दीपक तांबे, गोपीनाथ, माजी आ. मुंडे, ईश्वर मुंडे, किसनराव पवार, रामकृष्ण बांगर, शिंदे महादेव, पद्माकर सरपते, शिवाजीराव रांजवन, एड. इंदाणी, विलास बडगे, संजय गुंजाळ, भाऊसाहेब नाटकर, व्ही. एल. क्षिरसागर, मोहन सिरसाट , गोविंद वाघ, साखहरी गादळे, सोमनाथ बडे, डॉ. सानप, अनिल सानप, सत्यसेन मिसाळ आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांची बैठक; २ नोव्हेंबर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:14 AM