लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात या वर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग व अजित पवार यांच्याकडे कुकडीचे पाणी सीना धरणात व तिथून मेहकरी धरणात सोडण्यासाठी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार सीना धरणातून मेहेकरी धरणात ७.३० दलघमी वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिली असल्याचे आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर यांनी सांगितले.आ. आजबे बोलताना म्हणाले, २८ आॅक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील मेहकरी धरणात सीना धरणातून ०.५ टी.एम.सी पाणी सोडविण्यात यावे असे निवेदन मुख्य अभियंता (वि.प्र) जलसंपदा विभाग पुणे यांना दिल्याने ह्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. सीना मध्यम प्रकल्पातुन मेहकरी धरणात पिण्यासाठी अनुज्ञेय २५८.०४ एमसीएफटी म्हणजेच ७.३० दशलक्ष घनमीटर पाणी वाढीव मिळाले आहे. सीना - मेहकरी उपसा सिंचन योजनेसाठी कुकडी पाणलोट क्षेत्रातील १.२० अब्ज घनफूट इतके पाणी डावा कालवा मधून भोसे खिंड बोगद्याद्वारे सीना धरणात व १.२० अब्ज घनफूट पाण्यापैकी ०.५० अब्ज घनफूट पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मेहेकरी धरणात येण्याची सीना धरणातून उपसा सिंचन योजनेद्वारे मेहकरी धरणातील पाण्याची स्रोत वृद्धि सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालात तरतूद आहे. सद्यस्थितीत कुकडी डावा कालव्याद्वारे सीना मध्यम प्रकल्पात ६४५.११ एमसीएफटी पाणी सोडण्यात आले असून त्या प्रमाणात २५८.०४ एमसीएफटी पाणी मेहकरी योजनेमध्ये घेणे शक्य असल्याचे आजबे म्हणाले.यावेळी डॉ. शिवाजी राऊत, किशोर हंबर्डे, काकासाहेब शिंदे, आण्णासाहेब चौधरी, अॅड. पंढरीनाथ पारखे, जगन्नाथ ढोबळे, पोपट गर्जे, बबन रांजणे, सुरेश पवार उपस्थित होते.
मेहकरी धरणात वाढीव ७.३० दलघमी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:27 AM