शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पाटोद्यात उभारणार एमआयडीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:26 AM

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

ठळक मुद्देएप्रिलमध्ये फुटणार नारळ : १३ हेक्टरवर असणार ६० भूखंड

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.पाटोदा शहरापासून तीन किमी अंतरावर मांजरसुंबा रस्त्यावर एमआयडीसी उभारण्यासंदर्भात बीडच्या कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. उप अभियंता विनायक मुळे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे या संदर्भात पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी पाटोद्याला येऊन स्थळ पाहणी केली. तसेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. इतर आवश्यक सुविधा मिळू शकतात का ? याचीही चाचपणी केली. या सर्व पाहणीमध्ये अधिकाºयांकडून सकारात्मक बाजू जाताच औरंगाबादचे मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी यासाठी मंजुरी दिली आहे. चार दिवसांपूर्वी मंजुरीची कागदपत्रे बीड कार्यालयात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.वर्षभरात होणार काम पूर्णएप्रिलमध्ये नारळ फुटल्यानंतर साधारण वर्षभरात संपूर्ण एमआयडीसीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. सध्या या संदर्भात टेंडर प्रक्रिया सुरु आहे. रस्ते व इमारतींसाठी जास्त वेळ लागत असला तरी ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.रोजगाराची संधी उपलब्धआष्टी, पाटोदा, शिरुर कासार या तालुक्यांना सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे येथील तरुण रोजगारीसाठी मोठ्या शहरासाठी गेलेले आहेत. ही एमआयडीसी पाटोद्यात उभारल्यास तरुणांना येथेच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.दळणवळणाची सुविधा आवश्यकपाटोदा येथे सुसज्ज, सुविधायुक्त एमआयडीसी झाली तरीही येथे कच्चा माल आणण्यासाठी व पक्का माल नेण्यासाठी दर्जेदार व रुंद रस्ते होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीनेही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टॅग्स :BeedबीडMIDCएमआयडीसी