लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचे स्वरूप काळानुरूप बदलले जावे, जिल्ह्यातील शेतमजूर आणि शेतकरी आदींना आपण गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो तरच, शहराकडे होणारे स्थलांतर रोखता येऊ शकतं या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागतील, तसेच रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजना राबवून अनुशेष भरुन काढला जाईल असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्रीजयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा रविवारी घेताल यावेळी ते बोलत होते.जिल्ह्यातील मग्रारोहयो, कृषी, फलोत्पादनसह विविध कामांचा तपशीलवार आढावा मंत्रीजयदत्त क्षीरसागर यांनी घेतला. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी रोहयो प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, रोहयोतून विविध प्रकारच्या कामांसाठी मान्यता दिली जाऊ शकते. शेततळे, पांदण रस्ते, सिंचन अधिक कामे यातून होऊ शकतात याचा विचार करून नियोजन व्हावे, पांदण रस्ते विकासातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागू शकतो यामुळे पांदण रस्ते निर्माण करावेत, असे क्षीरसागर यावेळी म्हणाले. याप्रसंगी शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना तसेच या कामातील प्रगती, पिक विमा योजनेचे अनुदान वाटप, सोयाबीन मधील पिक विमा नुकसान भरपाईचा रकमा, आधार करण्यातील अडचणी यांची माहिती घेऊन ही कामे वेगात पूर्ण होण्यासाठी काम करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाºयांना दिल्या, यासोबत कृषी कर्ज वाटप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन मधील कामे, सामूहिक शेततळे, फळबाग योजना, रेशीम उत्पादन आदींची माहिती घेतली.फलोत्पादनमधून आंबा उत्पादकांसाठी ‘हाय डेन्सिटी प्लांटेशन’ ही संकल्पना यशस्वी झाली असून बेळगाव येथे याची लागवड यशस्वी झाल्याचे सांगून मंत्री म्हणाले एका मीटरवर आंब्याच्या झाडांची लागवड करून अधिक उत्पादनाच्या दृष्टीने शेतक-यांना माहिती व प्रशिक्षण दिले जावे जेणेककरुन शेतीमधील उत्पादन वाढेल. यासंबंधी कृषी विभागाच्या अधिका-यांना सूचना केल्या आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिभा चाटे, तहसीलदार अविनाश शिंगटे, आर. शिनगारे, दिलीप गोरे, अरुण डाके, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, मनमोहन कलंत्री, सत्यनारायण कासट, भगीरथ बियाणी, बाळासाहेब आंबुरे आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बीड शहराशी संबंधित पाणी पुरवठ्याच्या संबंधी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आढावा घेताना शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सुचित केले.शहराला पाणीपुरवठा करणा-या बॅक वाटरचा आढावा काडीवडगाव येथे जाऊन घेतला. यावर्षी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.नागरिकांनी देखील पाणी जपून वापरले. त्यामुळे शहराला कडक उन्हाळ््यात देखील पाणी कमी पडले नाही. तसेच पाणी जपून वापरण्याचे व वृक्ष लागवडीांदर्भात नागरिकांना आवाहन केले.दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांच्या वतीने स्वागत स्वीकारताना कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ व हार-तुरे न घेण्याची भूमिका जयदत्त क्षीरसागर यांनी घेतल्याचे याप्रसंगी दिसून आले.
रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर रोखता येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:20 AM