बीड: केमिकल पासून बनविलेल्या दुधाची डेअरीवर विक्री करणाऱ्या व्यक्तीला सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने २५ मार्च रोजी सकाळी छापा टाकून पकडले. ही कारवाई नागेशवाडी (ता. पाटोदा) येथे करण्यात आली.
आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे (रा. नागेशवाडी) हा स्वतःच्या फायद्याकरता केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो भेसळ करून डेअरी वर विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनी अन्न प्रशासन अधिकारी व पथकाला रवाना केले.या पथकाने छापा टाकला असता १६० लिटर भेसळयुक्त दूध व ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हवालदार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, विकास चोपणे,राजू वंजारे, आशा चौरे यांनी कारवाई केली. पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.