...
दिव्यांगाची लसीकरणासाठी ससेहोलपट
शिरूर कासार : सध्या तालुक्यात १८ ते ४४ व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. असे असले तरी लस उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. लसीचा पुरेसा साठा नाही. ऑनलाईन नोंदणीची अट आहे. त्यामुळे दिव्यांगाची ससेहोलपट होत आहे. दिवसभर रांगेत उभे राहूनदेखील ऑनलाईन नोंदणी नसल्याच्या कारणावरून दिव्यांग एका महिलेला लस मिळाली नसल्याने परत जावे लागले, असे येथील नागरिकांनी सांगितले. तरी दिव्यांगांची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
...
लोणचे बनविण्यासाठी कैऱ्यांचा शोध सुरू
शिरूर कासार : पाऊस चांगला झाल्याने यंदा आंब्याला चांगला मोहोर आला होता. कैऱ्याही मोठ्या प्रमाणात आल्या होत्या; परंतु गेल्या महिनाभरापासून सतत वादळी पाऊस, गारपिटीसारखे वातावरण असल्याने आंब्याचे नुकसान झाले आहे. आता हंगाम संपत आला आहे. यासाठी लोणचे बनविण्यासाठी कैऱ्यांना चांगली मागणी आहे. यामुळे अनेक जणांचा कैऱ्या खरेदीकडे कल वाढलेला दिसत आहे.