नॅक पीअर टीमचे (थर्ड साइकिल) अध्यक्ष एसव्हीएसएस नारायणा राजू (तामिळनाडू), सदस्य समन्वयक प्रोफेसर डॉ. मनीष कुमार वर्मा (उत्तर प्रदेश), समिती सदस्य प्राचार्य डॉ. जॉयदीप भट्टाचार्य (साऊथ गोवा) यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देऊन समाधान व्यक्त केले. रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, संगणकशास्त्र, गणित तसेच भूगोल, गृहशास्त्र, भाषाविषय, सामाजिक शास्त्रे, शारीरिकशास्त्र, क्रीडा विभाग यांची पाहणी करून प्रशंसा केली. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन कार्य, त्यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनाचे कौतुक केले.
महाविद्यालयाची भव्य व आकर्षक इमारत, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम, संशोधन कक्ष, भाषा कक्ष, कार्यालय यांचे कौतुक केले. माजी विद्यार्थी, पालक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधला. उच्च संस्कृती, उज्ज्वल भविष्य, चांगला प्राध्यापक वृंद असलेले महाविद्यालय अशी प्रशंसा केली. नॅक थर्ड सायकल पिअर टीमचे स्वागत संस्थेच्या सचिव खान सबीहा, प्राचार्य मोहम्मद इलियास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हानीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस व नॅक समन्वयक डॉ. अब्दुल अनिस यांनी केले.