आष्टी : तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी कोरोना नियमांचे पालन करत ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. आष्टी शहरातील शिवाजी चौकात राज्यातील सर्वांत उंच असलेल्या शिवस्तंभाचे उद्घाटन आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे यांच्या हस्ते सकाळी झाले. यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर, जि. प. सदस्य सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, आयोजन समितीचे पदाधिकारी सुनील रेडेकर, श्याम धस यांच्यासह सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरती ससाणे हिने ३०० किलो रांगोळीतून साकारलेली महाराजांची अश्वारूढ शिवप्रतिमा आकर्षक ठरली. तालुक्यातील पांढरी येथे साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. मातकुळी येथे मर्दानी खेळ, दांडपट्टा, मल्लखांब, झांज पथक, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे भाषण, शालेय विद्यार्थ्यांचे भाषणे डाॅ. जयदीप शिंदे (शिवशाहीर ) यांचा शिवजलसा संगीत कार्यक्रम पार पडले. तालुक्यातील कडा, धानोरा, धामणगाव, दौलावडगाव, दादेगाव आदी गावांसह शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
===Photopath===
190221\img-20210219-wa0781_14.jpg~190221\img-20210219-wa0780_14.jpg