नगर परिषदेचा विभाग काहीही उपाययोजना करत नसल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे. नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर आले आहे. कचऱ्याचे ढीग वाढतच आहेत. स्वच्छता होत नसल्याने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी आठवडा बाजाराचा दिवस व गौरी सणानिमित्त भाज्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र मोठी गैरसोय झाली. अरुणोदय मार्केटसमोरील दोन्ही बाजूने रस्त्यावर शेतकरी व शहरातील भाजीपाला विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी सोमवारी बसतात. या ठिकाणाहून जड वाहने जात असल्याने वाहतूककोंडीदेखील झाली.
जिजामाता उद्यान रस्त्यावरही हाल
परळी शहरातील जिजामाता उद्यान रोडवर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून दर पावसाळ्यात नागरिकांना कसरतच करावी लागते. अनेक नगरसेवक येथून येतात-जातात पण पाच वर्षे झाली, त्यांना या समस्यांवर मार्गच काढता आला नाही.
130921\img20210913090743_14.jpg~130921\img20210913093430_14.jpg