मिशन झीरो डेथ मोहिमेचा पहिला टप्पा १९ एप्रिल ते १० मे दरम्यान राबविला जात आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. थंडी, ताप, खोकला, सर्दी आदी आजार सध्या कोरोना चाचणी व भीतीपोटी लपवले जात आहेत, तर खासगीत किंवा घरगुती उपाय केले जात आहेत. परिणामी या रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, तर मृत्यूदर सुद्धा वाढत आहे, ही बाब चिंताजनक असल्याने मिशन झीरो डेथ हा उपक्रम सोमवारपासून सुरू झाला आहे. या मोहिमेत दररोज १०० कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मृत्यूदर शून्यावर ठेवण्यासाठी हा प्रयत्न असून, सुजाण नागरिकांनी सर्व्हे करणाऱ्या लोकांना सहकार्य करावे, आजार कुठलाही लपवून न ठेवता सांगितल्यास त्यावर उपचार करणे सोपे होईल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. घुबडे, गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे यांनी केले आहे.
===Photopath===
200421\rameswar lange_img-20210420-wa0004_14.jpg