शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आमदार-खासदार गेले पण शिवसैनिक ठाम;अंबाजोगाईच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिले निष्ठापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:05 PM

आमदारांपाठोपाठ खासदार देखील उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडून गेल्याने सर्वसामान्य शिवसैनिक अस्वस्थ आहेत.

अंबाजोगाई (बीड) : शिवसेना व शिवसैनिकांच्या जिवावर जे मोठे झाले, आमदार-खासदार अशी अनेक पदे मिळविली त्यांनीच शिवसेना सोडली. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आशयाचे पत्र अंबाजोगाई येथील युवासेनेचे पदाधिकारी अक्षय भूमकर यांनी स्वतःच्या रक्ताची शाई करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र लिहिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांमध्ये उभी फुट पाडल्याने शिवसेनेत अभूतपूर्व संकट आले आहे. आज तर दिल्ली येथे शिवसेनेचे बारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. आमदारांपाठोपाठ खासदार देखील उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडून गेल्याने सर्वसामान्य शिवसैनिक अस्वस्थ आहेत. आमदार, खासदार आणि पदाधिकारी जरी पक्षाला सोडून गेले असले तरी सामान्य शिवसैनिक मात्र अद्याप पक्षासोबत आहेत. अनेक प्रकारे शिवसैनिक स्वतःची निष्ठा दाखवत आहेत. अंबाजोगाई येथे देखील एका शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पक्षावरील निष्ठा दाखवली आहे.

''मी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र एक शिवसैनिक म्हणून सादर केले. ज्यांना ज्यांना शिवसेनेने मोठे केले असे आमदार, खासदार पदाधिकारी हे सर्वजण आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत. मात्र, शिवसेना या चार अक्षरांपासून मिळालेली ओळख हेच सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी पुरेसे आहे. ते आजही तनमनधनाने उध्दव ठाकरे व शिवसेनेसोबतच आहेत. शिवसेना हे चार अक्षरी नाव ज्वलंत ठेवण्यासाठी परिश्रम घेतील, असा आशावाद अक्षयने आपल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केला आहे.'' अक्षय भूमकर यांचे हे रक्तपत्र सोशल मीडियात व्हायरल झाल आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBeedबीड