ठळक मुद्देपीककर्जाची केवळ ५० प्रकरणे मंजूर केली आहेत.
आष्टी : रखडलेल्या पीक कर्ज प्रक्रियेमुळे लोकप्रतिनिधीने बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून गांधीगिरी केली. बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील एस.बी.आय. च्या शाखेमध्ये बारा गावातील सुमारे ९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कजार्साठी फाईल दाखल आहेत. यापैकी केवळ ५० प्रकरणे मंजूर केली आहेत. या मंदगतीच्या कामामुळे आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून विनंती करत आ. धस यांनी गांधीगिरी केली.