बीड : बीड मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हावेत आणि त्यात यापुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच बीड तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.बीड विधानसभा मतदारसंघातील पिकांच्या नुकसानीसंदर्भात आ. संदीप क्षीरसागर यांनी बैठक बोलावली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, माजी आ. सय्यद सलीम, सुनील धांडे, सिराज देशमुख यावेळी उपस्थित होते. बैठकीत आ. क्षीरसागर यांनी पीक पंचनामे, शेतकऱ्यांची घरे, विहिरी, जनावरे यांच्या पंचनाम्याबाबत सुचना केल्या. तसेच यात राजकारण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी उपजिल्हाधिकारी टिळेकर यांनी प्रशासन शेतक-यांसोबत असून कोणाचेही नुकसान होणार नाही असा शब्द दिला. शहरी व ग्रामीण भागात रोगराई पसरू नये याची काळजी घ्या, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू बाबत तातडीने पंचनामे करून घ्या, सर्व क्षेत्राचे पंचनामे करून घ्यावेत कोणीच विंचित राहता कामा नये याची प्रशासननाने खबरदारी घ्यावी असे आदेश आ. संदीप क्षीरसागर यांनी दिले आहेत. शेतक-यांना पिक विम्याचा लाभ देखील तात्काळ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने गतिने काम करावे असे आवाहन विमा कंपनीच्या प्रतिनिधीला यावेळी क्षीरसागर यांनी केले.
अधिकाऱ्यांना सूचना देत शेतात जाऊन आमदारांनी केली नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 11:48 PM
बीड मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हावेत आणि त्यात यापुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या.
ठळक मुद्देसंदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा