परळी : २०१८-१९ मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे एफआरपी प्रमाणे व्याजासह, तसेच तोडणी वाहतूक बिल, कामगारांचे पैसे पन्नगेश्वर साखर कारखान्याने तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले.आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे, रेखा अंबुरे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, श्रीराम सावंत, केज तालुकाध्यक्ष कल्याण केदार, भागवत कांदे, शेतकरी चेतन चव्हाण, जयराम कस्तुरे, धर्मराज जाधव, रतन हरी कांदे, परमेश्वर आंबेकर आदींसह मनसेचे पदाधिकारी व शेकडो शेतकरी सहभागी होते.दरम्यान, वीस दिवसांमध्ये शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले.लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबलेआंदोलनाला परवानगी न दिल्यामुळे पोलिसांनी मनसे पदाधिकारी व आंदोलकांना उपोषणाला बसू दिले नाही. यावेळी मनसे व भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे मुंडे यांच्या घरासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे पदाधिकारी व शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हा वाद मिटला. मनसे कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये उपोषण चालू केले होते. पंकजा मुंडे व लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, साखर सहसंचालक वांगे यांच्या आश्वासनानंतर तसेच पन्नगेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किसनराव भंडारे, संचालक सुरेश लहाने, वसंतराव दहिफळे, जय्याप्पा हलगुडे आदींनी ठाण्यामध्ये येऊन १५ ते २० दिवसांत शेतकºयांचे थकित पैसे देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले. वेळेत कारखान्याने पैसे न दिल्यास वरळी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी यावेळी सांगितले.
ऊसबिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:30 AM
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे एफआरपी प्रमाणे व्याजासह, तसेच तोडणी वाहतूक बिल, कामगारांचे पैसे पन्नगेश्वर साखर कारखान्याने तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांचीही घोषणाबाजी; ऊसबिलाच्या प्रश्नावर आंदोलन