नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरूस्त हातपंप दुरुस्तीची मागणी होत आहे.
वीजतारा लोंबकळल्या
गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. वीजतारा ताणण्याकडे ‘महावितरण’चे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. दुरुस्तीची मागणी केली जात आहेत तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढत आहे.
पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागांंतील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड होते. दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. कबाडगल्ली, बुंदेलपुरा, जव्हेरीगल्ली, मोमीनपुरा भागामध्ये काही पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी होत आहे.