लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वडवणी व धारुर येथील बाजारातून ८ मोबाईल चोरी करणारा आरोपी सुंदर बापू गुंजाळ याला बीड येथील गांधीनगर भागातून मंगळवारी अटक केली आहे. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली आहे. त्याचसोबत इतर संशयितांचा शोध सुरू आहे, असे पथकाने सांगितले.रविवारच्या बाजारात तसेच धारुर व वडवणी या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. मोबाईल चोरीच्या संदर्भात संदर्भात मागील दोन दिवसांत गुन्हे दाखल झाले होते. तसेच एक बॅग व मोबाईल चोरी गेल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानुसार तपासाची सूत्रे गतिमान करत दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख गजानन जाधव यांनी संशयित आरोपींना मंगळवारी सकाळी ८ वाजता शहरातील गांधीनगर भागातून ताब्यात घेतले, त्या सर्वांकडे चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच सुंदर बापू गुंजाळ याने ८ मोबाईल चोरल्याची कबुली दिली. सर्व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आरोपीने कबुली दिल्यामुळे याच्याकडून माहिती घेऊन इतर चोरट्यांचा शोध घेतला आहे. ही कारवाई दरोडा प्रतिबंधकचे गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत शिंदे, अशोक दुबाले, भागवत चव्हाण, श्रीमंत उबाळे यांनी केली आहे.वेषांतर करुन करायचा मोबाईल चोरीआठवडी बाजार व गर्दीच्या ठिकाणी तसेच वेगवेगळ््या शहरात जाऊन गुंजाळ हा मोबाईल चोरी करत होता. मात्र, ओळख पटू नये यासाठी तो वेषांतर करुन चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
बाजारातून मोबाईल चोरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:38 AM