बीड : बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काही दिवसांपूर्वी बदल्या केल्या होत्या. यावेळीही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत बदलीविरोधात निवेदन दिले होते. दरम्यान, ही बदली प्रक्रिया नियमाप्रमाणे राबविल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काही सहा अव्वल कारकून आणि सहा महसूल सहायकांच्या बदल्यांमध्ये फेरबदल केले आहेत.
बीडमधील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काही दिवसांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले होते. मात्र या बदल्या करताना नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेने केला होता. तसेच काहींनी या संदर्भात ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. मात्र, ही बदली प्रक्रिया नियमांप्रमाणे झाल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बीडचे नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी सहा अव्वल कारकून आणि सहा महसूल साहाय्यकांच्या बदली आदेशात फेरबदल केले आहेत.
....
बदल्यांमध्ये अनियमितता कायम
महसूल कर्मचारी बदली प्रक्रियेविरुद्ध ‘मॅट’मध्ये गेले आहेत. त्यामुळे समजूत काढण्यासाठी हे बदल नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत. मात्र, तरीदेखील अनेकांची गैरसोय होत असल्याचे मत व्यक्त करीत, बदली प्रक्रियेतील प्रकरणावर ‘मॅट’मध्ये ठाम राहणार असल्याचे मत महसूल कर्मचारी संघटना (गट क) यांच्यावतीने सांगण्यात आले.
...
बदल्यांतील बदल असे...
अव्वल कारकून : अनिल पवार (बदली रद्द ), दिगंबर तांदळे (पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, माजलगाव), संजय हांगे (समन्वय, भूसंपादन, बीड), बन्सी नायबळ (उपविभागीय अधिकारी कार्यालय, माजलगाव), प्रसाद रूपदे (बदली रद्द), गोकुळ ननवरे (तहसील कार्यालय, केज).
महसूल सहायक : दत्तात्रय चौधरी (संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड), सत्यनारायण गोविंदराव (तहसील कार्यालय, माजलगाव), रामलिंग कांबळे (तहसील कार्यालय, अंबाजोगाई), शेख बाबर, शैलजा ओव्हाळ, मनीषा बगे (बदली रद्द).