महावितरणने सार्वजनिक बोअरचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल झाले. तत्काळ सार्वजनिक बोअर सुरू करा या मागणीसाठी बुधवारी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. बोअरसाठी पुरवठा आकड्यावर असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत कनेक्शन कट केले. परंतु, गावातील सर्व सार्वजनिक बोअरचे कनेक्शन पुन्हा जोडण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, एवढ्या गंभीर प्रश्नावर गावकरी आंदोलन करीत असताना अनेक ग्रामपंचायत सदस्य यावेळी अनुपस्थित होते.
गावातील महावितरणच्याही कर्मचाऱ्यांविरोधात प्रचंड तक्रारी असून, त्यांचीही चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याप्रसंगी सरपंच श्यामराव राठोड, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सार्वजनिक बोअरचा पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते सोडण्यात आले. यावेळी महिला, लहान मुले, आबालवृद्ध हंडे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
240321\purusttam karva_img-20210324-wa0019_14.jpg