माजलगाव : जमीयत उलेमा कौन्सिलच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी तालुक्यातील पात्रुड येथील हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे. सलग पाचव्यांदा त्यांची निवड झाली आहे.
जमीयत उलेमा प्रशासक मंडळाची अकोला येथे सोमवारी बैठक झाली. यामध्ये राज्यातील विविध जिल्हा आणि तालुक्याचे अध्यक्ष, प्रशासक, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीत धार्मिक शिक्षण मंडळ उत्तरप्रदेशचे अध्यक्ष सय्यद मुफ्ती अफ्फान मन्सूरपुरी यांच्या उपस्थितीत जमीयत उलेमा कौन्सिल महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी पात्रुड येथील हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अब्दुल कादिर मदनी, कारी मुहम्मद सादिक खान, कारी मुहम्मद अयूब, अब्दुल रशिद यांची तर मुहम्मद अयूब आझमी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीस प्रा. हाफिज दारूल, हबीब उर रहमान, अयूब आझमी, शम्स उल हक, माजिद पटेल, ताहोर खान पठाण, हुजैफा कास्मी, नदीम सिद्दीकी, युसूफ जमाल, आझाद कासमी, सिराज कासमी, उस्मान मन्सूर, रोशन दारूल यांची उपस्थिती होती. आभार शाह कास्मी यांनी मानले.