लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शहरात गेल्या काही दिवसांपासून गल्लोगल्ली, मुख्य चौकात, मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्रे व मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट जनावरेही रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. त्यांचाही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
या मोकाट कुत्र्याचा व जनावरांचा नगरपरिषदेने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, दत्ता दाभाडे, अमित वैद्य, शुभम टाक यांनी केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून गजानन नगर, भगवान नगर, सरस्वती काॅलनी, संजय नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती काॅर्नर, नवीन बसस्थानक, सावता नगर, मोढा नाकासह शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्याचा व मोकाट जनावरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कुत्रे व जनावरे रस्त्यावर उभे राहत असल्याने वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहेत. मात्र हे मोकाट कुत्रे व जनावरे अचानक एकमेकांवर भिडत आहेत. यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत.
....
मोकाट जनावरांबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. या मोकाट कुत्रे व जनावरांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल.
- भागवत येवले, स्वच्छता निरीक्षक, गेवराई नगरपरिषद
060921\20210906_115136_14.jpg
गेवराई शहरात मोकाट कुत्रे, जनावरांचा वावर वाढला आहे.