बीड : माजलगावमधील संजय रांजवण यांच्या घरी दरोडा टाकणाºया सात अट्टल गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सहा आरोपी जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील असून एक माजलगावमधील आहे. या आरोपींनी पाच जिल्ह्यांत धुमाकूळ घालत दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गुन्हे केले होते. अखेर त्यांच्यावर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी कारवाई केली.
संजय तुकाराम गायकवाड (भोकरदन जि.जालना), अण्णा मारोती शिंदे, अंकुश मारोती शिंदे (मुकूंदवाडी जि.औरंगाबाद), भास्कर साहेबराव शिंदे (इरेगाव ता.मंठा जि.जालना), किरण अशोक जाधव (खरात मंगरूळ ता.घनसावंगी, जि.जालना), उत्तम काशिनाथ गायकवाड (केसापुरी कॅम्प ता.माजलगााव, जि.बीड) यांच्यासह अन्य एकाचा कारवाईत समावेश आहे.
१४ सप्टेंबर रोजी या सहा जणांनी रांजवण यांच्या घरी दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तीन लाख ३८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी याप्रकरणात लक्ष घालत अवघ्या काही दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी त्यांच्याविरूद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अधीक्षक श्रीधर यांच्या मार्फत पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांच्याकडे पाठविला.
त्यांनी चौकशी करून सोमवारी कारवाईचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अरविंद गाडे, निरीक्षक तळेकर, फौजदार विकास दांडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकाने तपासात परिश्रम घेतले होते.
येथे घातला धुमाकूळ४सात अट्टल गुन्हेगारांची ही टोळी आहे. त्यांच्यावर बीडसह माजलगाव शहर, माजलगाव ग्रामीण, बीड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांत धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या कारवाईमुळे सामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.