परळी : धुणीभांडी करण्यासाठी कामाला ये, नाहीतर तुझ्या विरोधात पैसे व सोने चोरून नेले अशी तक्र ार पोलीस ठाण्यात करु, अशी धमकी दिल्याने मोलकरीण छबुबाई नारायण पाचमासे (वय ५५, रा. स्नेह नगर) हिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलगा दिलीप नारायण पाचमासे यांनी परळी शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन धमकी दिल्याप्रकरणी मंजूषा गणेश पूजारी (रा. जलालपूर परळी) हिच्या विरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील स्नेहनगर भागात राहणारी छबुबाई नारायण पाचमाशे ही महिला दोन वर्षापासून जलालपूर भागातील एका निवासी परिसरात धुणीभांडी घासण्याचे काम करीत होती. तिला दोन मुले व तीन मुली आहेत. ७ नोव्हेंबर रोजी तिने विषारी द्रव प्राशन केले. तिच्यावर परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.येथून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता तिचा मृत्यू झाल्याचे ८ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. चोरीचा आरोप सहन न झाल्याने छबुबाई हिनेआत्महत्या केल्याचे सांगत नातेवाईकांनी शनिवारी तिचा मृतदेह शहर पोलीस ठाण्यात आणला. चोरीचा आळ घेणाºया महिलेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हनुमंत कदम, सपोनि जाधव यांनी भेट दिली. तर दिलीप पाचमासे याच्या फिर्यादीवरुन मंजूषा पुजारी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हात फॅक्चर झाल्याने ७ रोजी छबुबाई या कामाला गेल्या नव्हत्या. धुणीभांडी करण्यासाठी कामाला ये, नाहीतर तुझ्या विरोधात पैसे व सोने चोरून नेले अशी तक्र ार पोलीस ठाण्यात करु अशी मंजुषा पुजारी यांनी धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
चोरीचा आरोप असह्य झाल्याने मोलकरणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:06 AM
धुणीभांडी करण्यासाठी कामाला ये, नाहीतर तुझ्या विरोधात पैसे व सोने चोरून नेले अशी तक्र ार पोलीस ठाण्यात करु, अशी धमकी दिल्याने मोलकरीण छबुबाई नारायण पाचमासे (वय ५५, रा. स्नेह नगर) हिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.
ठळक मुद्देधमकीप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल