बीड : बालकांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच बालकांचे पहिले १००० दिवस, रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीनुसार जनजागृती करण्यासाठी पोषण उत्सवाला रविवारी प्रारंभ झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर. बी . पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे , महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान तसेच जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.यावेळी चंद्रशेखर केकान यांनी पोषण माह कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. बालकांचे पहिले एक हजार दिवस, रक्तक्षय, अतिसार, हात धुणे, स्वच्छता आणि पौष्टिक आहार या पंचसूत्रीवर महिनाभरात आयोजित करावयाच्या उपक्रमांची माहिती दिली. आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, एएनएम यांची संयुक्त गृहभेट, गणेशोत्सवात बॅनर व रांगोळी द्वारे जनजागृती, पोषण मेळावा, समुदाय आधारित विविध कार्यक्रम, आरोग्य शिबीर, ग्राम आरोग्य व पोषण दिवस, प्रभातफेरी, मुलीची सायकल रॅली, परसबाग उपक्रम, किशोरी मेळावा, बचतगट बैठक, अंगणवाडी हात धुणे कार्यक्रम, शाळेत विविध कार्यक्रम, पालक मेळावे आदी कार्यक्रम सर्व गावात शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त मोहिमेतून पोषण उत्सव घरा घरात पोहोचवण्याचे आवाहन केले.केज प्रकल्प अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगल गीते यांनी पोषण अभियान गीतातून आहार, आरोग्य, बेटी बचाओ, संस्थात्मक प्रसूतीचे महत्व विशद केले.बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये यांनी पोषण अभियानात सूक्ष्म नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हा समूह साधन व्यक्ती भूषण विडले यांनी आयसीडीएस डॅश बोर्डबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट हुंडेकर यांनी केले.यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी उद्धव सानप , रामेश्वर मुंडे , जायभाये, सखाराम बांगर, दहिवाल, आघाव, शोभा लटपटे, तांदळे यांच्यासह तालुका समन्वयक, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कार्यकर्ती, साधन व्यक्ती, गट समन्वयक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विस्तार अधिकारी वैभव जाधव, अजय निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.
कुपोषणासह अॅनिमियामुक्तीसाठी महिनाभर पोषण उत्सव अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:52 PM
बालकांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच बालकांचे पहिले १००० दिवस, रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीनुसार जनजागृती करण्यासाठी पोषण उत्सवाला रविवारी प्रारंभ झाला.
ठळक मुद्देमहिला बालकल्याण, आरोग्य विभागाकडून गावागावात जनजागृती