सिटू संघटनेच्या केंद्रीय कमिटीने २४ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारत देशात आंदोलन करण्याचे ठरवले होते. त्याचाच भाग म्हणून माजलगाव योजना कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अंगणवाडी कार्यकर्ती मिनी अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, गटप्रवर्तक, शालेय पोषण कामगार, इमारत बांधकाम कामगार सामील झाले होते. यावळी ४५ व्या श्रम परिषदेने सुचविलेल्या शिफारशी लागू करा. सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान एकवीस हजार मानधन लागू करा. सामाजिक सुरक्षा लागू करा. कायम वेतनावर कर्मचाऱ्याची नियुक्ती करा. आशा व गटप्रवर्तक यांना विनामोबदला कामे सांगू नका. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा. शालेय पोषण कामगारांना कायम नियुक्ती द्या. सेंट्रल किचन पद्धत बंद करा. ऊसतोड वाहतूक कामगारांची कल्याणकारी मंडळात नोंदणी सुरु करा आदी मागण्या करण्यात आल्या.
या वेळी सिटू संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कुरे, मोहन जाधव, सय्यद रज्जाक, ऊर्मिला शेंडगे, अर्चना पांचाळ, सादेक पठाण, शेख चुन्नू, रामराव बादाडे, कुसुम खरमारे, विद्या कुरे, सारिका नवले, उषा ओसे, राधा काष्टे, सलमा भाभी, सुवर्णा ठोंगे, शेख अन्वर इत्यादींनी सहभाग घेतला.
240921\purusttam karva_img-20210924-wa0040_14.jpg