बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होते. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी ६ हजार ५०० शेततळ््यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. जिल्ह्यामध्ये ६ हजार ७३१ शेतक-यांनी मागले त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
शेततळ्यांची संख्या वाढल्याने शेतकºयांसाठी पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे खरीप, रबी या दोन्ही हंगामांतील पारंपरिक पिकांसह शेतकरी फळ लागवड व इतर शेतीपूरक व्यवसायांकडे वळेल असे मत कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या झालेल्या कामांमुळे दुष्कळी परिस्थिवर मात करण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होणार आहे.पुढील उद्दिष्ट वाढवण्याची मागणीमागेल त्याला शेततळे या योजनेमुळे शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहे. शासनाने या योजनेतील उद्दिष्ट वाढवून द्यावे जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना याचा लाभ घेता येईल, अशी मागणी जिल्ह्यातील शेतक-यांनी केली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणीमागेल त्याला शेततळे योजनेमुळे मोठा फायदा झाला असून, पावसाळ्यात शेततळे भरल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था झाली आहे. पाण्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे चांगले पैसे मिळू लागले आहेत. तसेच पुढील काळात फळबाग लागवड करण्याचा मानस आहे.- युवराज विलासराव जगताप, शेतकरी