शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

'८० लाखांत नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण'; अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस आला होता एजंटचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 3:50 PM

‘तुला अभ्यास करण्याची गरज नाही. आम्ही परीक्षा केंद्रांसह सर्व काही मॅनेज करतो. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील’

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई : तुला नीट परीक्षेत ६५० पेक्षा जास्त गुण मिळतील. तुझा चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये द्यावे लागतील, असा फोन सलग दोन वेळा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस दलालामार्फत आला होता. हा प्रकार त्या मुलीने नीट परीक्षेतील पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आपल्या पालकांना सांगितला.

अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तारेखअली उस्मानी यांची मुलगी हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेते. ती यावर्षी नीट परीक्षेसाठी बसली होती. तिचा परीक्षेचा अभ्यासही सुरू होता. तिने परीक्षा फॉर्म भरून दिला. याच कालावधीत परीक्षेपूर्वी तिला एका दलालाचा फोन आला. ‘तुला आम्ही नीट परीक्षेत ६५०पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ, तुझा चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. अभ्यास करण्याची गरज नाही. आम्ही परीक्षा केंद्रांसह सर्व काही मॅनेज करतो. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील,’ असा फोन आला.

परंतु, त्या विद्यार्थिनीने काहीही प्रतिसाद दिला नाही. परत दलालाचा फोन आला. तरीही तिने या गोष्टीस नकार दिला. जेव्हा नीट परीक्षेतील सावळा गोंधळ सुरू झाला, त्यावेळी ही बाब त्या मुलीने आपल्या वडिलांना सांगितली व या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. दरम्यान, अशा प्रकारचे आमिष अंबाजोगाईतील आणखी दोन ते तीन पालकांनाही दाखविण्यात आले असल्याचे समोर आले आहे. मात्र, नको ती भानगड, यामुळे अनेक पालकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :laturलातूरneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकCrime Newsगुन्हेगारी