शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

अडीच महिन्यांच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:20 AM

कीकडे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, असा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला आजही समाजाची मानसिकता बदलली नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देगेवराईतील घटना : चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बीड : एकीकडे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, असा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला आजही समाजाची मानसिकता बदलली नसल्याचे समोर आले आहे. एका अडीच महिन्याच्या जिवंत मुलीला रस्त्यावर सोडून देत माता फरार झाली. ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंंगीजवळील टोलनाका परिसरात मंगळवारी पहाटे उघडकीस आली. ग्रामस्थांनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.पाडळसिंगीजवळील टोलनाका परिसरात एका बाळाचा रडण्याचा आवाज याच भागात राहणाºया नागरिकांच्या कानी पडला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना एक मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला टाकलेले दिसले. हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. ते अवघ्या पाच मिनिटांत पोहोचले आणि चिमुकलीला घेऊन पहाटे ५ वाजता जिल्हा रुग्णालयात आले. येथील डॉ.मोहिनी जाधव व त्यांच्या टीमने या चिमुकलीवर तात्काळ उपचार केले. सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. गेवराई पोलीस ठाण्यात पो. ना. दत्ता चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.‘त्या’ प्रकरणाचा तपास अपूर्णचबीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी दोन दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले होते. या बाळावर उपचार करून नंतर शिशुगृहात पाठविण्यात आले होते. हे बाळ कोणी टाकले, याचा तपास मात्र, अद्यापही बीड ग्रामीण पोलिसांना लागलेला नाही.डॉक्टर, ग्रामस्थांकडून मायेची उबचिमुकली सापडताच ग्रामस्थांनी तिला जवळ घेऊन दूध पाजले. जिल्हा रुग्णालयात आल्यावर डॉ.मोहिनी जाधव-लांडगे, परिचारिका मोहोर डाके, मीरा नवले यांनी तिला आंघोळ घालून उपचार केले.तसेच मायेची ऊबही दिली. बाळाचे वजन साडे तीन किलो असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉ.जाधव यांनी सांगितले. फरताडे अमोल, गणेश काळे, सोनू देवडे आयआरबीच्या या कर्मचाऱ्यांनीही मदत केली.

टॅग्स :Beedबीडnew born babyनवजात अर्भकFamilyपरिवारSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी