आष्टी : आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. आई असल्यावर कळते आणि नसल्यावर समजते. आई व बाबा जाणे सोपी गोष्ट नाही. तुम्ही कितीही मोठे झालात तरी ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’. जोपर्यंत आई-वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. आईने पाठीवर जरी हात फिरवला तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ मिळते, असे प्रतिपादन ह.भ.प. पुष्पा तावरे महाराज यांनी केले. आष्टी येथे कदम परिवाराच्यावतीने आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आई ४२ कुळांचा तर बाबा २१ कुळांचा उद्धार करणारे असतात. नारी रत्नांची खाण आहे. मरावे पण कीर्तीरुपी उरावे याप्रमाणे कै. सुमन भगवानराव कदम यांनी संस्काराने चांगले कुटुंब घडवल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी ह.भ.प. सविता खेडकर म्हणाल्या, ज्या आईने नऊ महिने पोटात वाढवले अशा आई -वडिलांना वद्धाश्रमामध्ये काही लोक ठेवतात. कितीतरी मोठमोठ्या लोकांचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत. कितीही मोठे दुःख आईच्या पदराखाली झाकले जाते, असे त्या म्हणाल्या. यावेळी ह.भ.प. नीळकंठ तावरे महाराज यांनी भाव व्यक्त केले. यावेळी परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
010821\01bed_1_01082021_14.jpg