सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात ‘एड्स’बाबत जनजागृती झाल्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला आहे. महिला गरोदर असताना आणि प्रसुतीनंतर वारंवार तपासणी केल्याने ९ वर्षांत माता एचआयव्ही ‘पॉझिटिव्ह’ असतानाही त्यांची २७० मुले निगेटिव्ह जन्मली आहेत. औषधोपचारामुळे त्यांना एक नवी संजीवनी मिळाली आहे. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आढावा घेतल्यानंतर हे कौतुकास्पद यश समोर आले.जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २००६ व बीडमध्ये २००९ मध्ये एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सेंटर सुरू करण्यात आले. येथे रुग्णांची तपासणी करून उपचार केले जातात. माता तपासणीसाठी येताची रक्त तपासणी केली जाते. ती बाधित असल्याचे समजताच ‘डापकू’ विभागाकडे पाठविले जाते. येथे तिचे सुरूवातीला समुपदेशन करून आधार दिला जातो.त्यानंतर तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले जातात. बाळ पॉझिटिव्ह असले तरी प्रसुतीनंतर त्याच्या वारंवार केलेल्या तपासण्या आणि औषधोपचारामुळे ते निगेटिव्ह होऊ शकते, हे समोर आले आहे.यासाठी एड्स होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेण्याबरोबरच मनातील गैरसमज दुर करून तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी सांगितले.३०२ पैकी केवळ ३२ पॉझिटिव्हज्या माता गरोदरपणात पॉझिटिव्ह होत्या, त्यांची ३२० मुले तपासणीत पॉझिटिव्ह आली होती. सहा आठवडे, ६ महिने, १२ महिने व १८ महिन्यात शेवटची तपासणी करून पैकी २७० मुले निगेटिव्ह करण्यात डापकू विभागाला यश आले आहे. केवळ ३२ मुले पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.१३ वर्षांत ३२९० जणांचा बळीएड्स या रोगाने आतापर्यंत बीड जिल्ह्यात तब्बल ३ हजार २९० नागरिकांचा बळी घेतला आहे. यात महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या एआरटी सेंटरमध्ये जवळपास साडेसहा हजार रुग्ण उपचार घेत असून त्यांचा नियमित पाठपुरावा केला जात आहे. यात १८ महिने ते १८ वर्षांपर्यंतच्या ४३८ मुलांचाही समावेश आहे.
माता एचआयव्ही ‘पॉझिटिव्ह’; मुले जन्मली ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:58 PM
जिल्ह्यात ‘एड्स’बाबत जनजागृती झाल्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला आहे. महिला गरोदर असताना आणि प्रसुतीनंतर वारंवार तपासणी केल्याने ९ वर्षांत माता एचआयव्ही ‘पॉझिटिव्ह’ असतानाही त्यांची २७० मुले निगेटिव्ह जन्मली आहेत. औषधोपचारामुळे त्यांना एक नवी संजीवनी मिळाली आहे. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आढावा घेतल्यानंतर हे कौतुकास्पद यश समोर आले.
ठळक मुद्देऔषधोपचारामुळे संजीवनी : सहा आठवड्यापासून १८ महिन्यापर्यंत चार वेळा तपासणी