माजलगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शनिवारी तालुक्यातील मोठीवाडी फाटा तेथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील, माकपचे मुसद्दीक बाबा, शेख याकूब यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड आदींचे नेते, या सर्व पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे परत घ्यावेत अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेकापचे नेते ॲड. नारायण गोले पाटील यांनी दिला. यावेळी तब्बल दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या आंदोलनासाठी पप्पू हिवरकर, कुंडलिक खेत्री, संभाजी चव्हाण, संभाजी पास्टे, ॲड. पांडुरंग गोंडे, आनंद यादव, ज्ञानेश्वर खेत्री, विद्यासागर खेत्री, ज्ञानेश्वर चव्हाण, भगवान रोकडे, तुकाराम खेत्रे, कडाजी नावडकर, अशोक गायकवाड, जगन खेत्री, वैजनाथ कटके, धैर्यशील गोंडे, नितीन जाधव, विलास जाधव आदींनी परिश्रम घेतले.
मोठीवाडी फाटा येथे शेकाप, माकपचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:31 AM