शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:01 AM

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात आंदोलन : ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करा’

बीड : केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. मात्र, ते अन्यायकारक आहे, व संविधान विरोधी आहे. त्यामुळे देशामध्ये फाळणी होऊ शकते. त्यामुळे हे विधेयक धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे, घटनाविरोधी आहे. त्यामुळे ते तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलन करून मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलक डोक्यास व दंडावर काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. यावेळी ‘सीएबी नाही शिक्षण, रोजगार पाहिजे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.१३ डिसेंबर रोजी दुपारच्या नमाजनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सीएबी-एनसीआर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र शासनाने आणले आहे. ते दोन्ही सभागृहात पास झालेले आहे. यामध्ये देशातील जवळपास सर्व जाती धर्मांना सामावून घेण्यात आले आहे. मात्र, मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून देशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांधून व्यक्त केली जात आहे. असे विधेयक आणून केंद्र सरकार समाजासमाजात तेढ निर्माण करत आहे. तर या कायद्यामुळे संविधानाची पायमल्ली केली जात आहे. या कायद्यास देशभरात विरोध करण्यात येत आहे. याचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील उमटले. सीएबीच्या विरोधात काल बीड सह धारूर, केज, माजलगावसह अन्य काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले.शांततेत व शिस्तीत आंदोलनबीड येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या हातात ‘सीएबी नाही रोजगार, शिक्षण, संरक्षण, अपराध मुक्त देश पाहिजे’ असे लिहिलेले घोषणाफलक होते. यावेळी शांततेत व शिस्तीत आंदोलन पार पडले.संघटनेच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुफ्ती जावेद कासमी, मुफ्ती अब्दुल कासमी, सौलाना सय्यद साबीर, मौलाना जाकीर, मुफ्ती मोहीयोद्दीन, मौलाना इलियास कासमी, काझी जफर, अ‍ॅड शफीक , प्र.इलियास इनामदार, सौलाना अब्दुल रहीम, अब्दुल सलाम सेठ, महमद खामोद्दीन, माजी आ. सय्यद सलीम, न.प.उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी आ. सुनिल धांडे, संजय मालाणी, भागवत तावरे, अशोक हिंगे आदींनी मार्गदर्शन करून भारताच्या एकतेच्या व अखंडतेवर कोणालाही गंडातर आणू देणार नाही. आम्ही सर्व जण एकत्र येऊ असा नारा यावेळी दिला.

टॅग्स :BeedबीडMuslimमुस्लीमMorchaमोर्चाagitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक