शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

विम्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:43 AM

शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : जिल्ह्यात गतवर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकासह सर्वच पिके करपून गेली. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीकडे विमा भरला, मात्र अद्याप ही या शेतक-यांना विम्याची रक्कम अदा करण्यात न आल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. यावर कंपनीने महिन्यात शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले.आपल्या पिकाचे विमा संरक्षण ही शेतक-यांनी काढले होते. जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे काम दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीला दिले होते. सर्व पिके दुष्काळामुळे गेली असताना यावर्षी पेरणीचे दिवस आले असताना विमा कंपनीने विम्याची रक्कम शेतक-यांना अदा केली नाही. वारंवार प्रशासनासह विमा कंपनीकडे पैशाची मागणी करून प्रशासन व विमा कंपनी दाद मिळत नव्हती. यावर शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यानी पुढाकार घेत शेकडो शेतक-यांसह सोमवारी थेट पुणे येथील दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा नेला. आमच्या हक्काचे पैसे द्या, अशी मागणी करत कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. अखेर महिनाभरात विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापकांनी दिले.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरीPuneपुणेCrop Insuranceपीक विमा