लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांंकडून दोन महिन्यांपासून गाळप केलेल्या उसाचे बिल अदा न केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ उलटला आहे. कारखान्यांनी ऊस गाळप केला, पण गाळप केलेल्या उसाचे अद्याप बील अदा केलेले नाही. वास्तविक पाहता गाळप केलेल्या उसाचे बिल १५ दिवसांच्या आत अदा करावे, असा नियम आहे. परंतु तालुक्यातील सुरु असलेल्या सर्व तीन कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा केलेले नाहीत. ऊस बिल त्वरित अदा करावे, गतवर्षीच्या फरक बिलातील रक्कम तत्काळ द्यावी, २६५ वाणाचा ऊस गाळप करावा आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून ऊसउत्पादकांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले.
शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:27 AM
तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांंकडून दोन महिन्यांपासून गाळप केलेल्या उसाचे बिल अदा न केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देसाखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन : थकित ऊस बिले देण्याची मागणी