बीड : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जमीअत उलेमा-ए-हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
स्वातंत्र्यानंतर देशातील मुस्लिम समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेला आहे. आज या समाजाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्याची गरज आहे. या संदर्भात अनेकवेळा आंदोलने केली, निवेदने दिली, मोर्चेही काढले परंतु या सरकारने मुस्लिम आरक्षण देण्यासंदर्भात कसलीच कारवाई केली नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
मुस्लिम समाजाला वेळीच आरक्षण दिले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जमीअत उलेमा-ए-हिंदच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मुफ्ती अब्दुल्लाह कासमी, मौलाना साबेर साहब, मुफ्ती अन्वर साहब, मौलाना मारुफ मोमीन, हाफेज अशफाक, फरीद देशमुख, खुर्शीद आलम, मुकर्रम जान, महंमद खमरोद्दीन, नगरसेवक इद्रीस हाश्मी, खालेक पेंटर यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.