लोकमत न्यूज नेटवर्कबीड: आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.शेतकºयांना योग्यरित्या अंडीपुंजचा पुरवठा करावा व त्यानंतर नवीन शेतकºयांचा या योजनेमध्ये सहभागी करुन घ्यावे, वेळेवर अंडीपुंज शेतकºयांना देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा रेशीम कार्यालयासमोर रेशीम उत्पादक शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात राहुल चव्हाण, महेश बुद्धदेव,दादासाहेब पवार(बीड), लकुळ कदम (बीड), उद्धव घोलप(बीड), सुनिल नेहरकर (गेवराई), नवजीवन तिडके(परळी), किसनराव जाधव (अंबाजोगाई), संपत परळकर(केज), सुभाष जरे(आष्टी), चिंतामन दुटाळ, खोटे सर (माजलगांव), ज्ञानोबा मुंडे (परळी) यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी सहभागी होते.रेशीम उत्पादक अडचणीतजिल्ह्यात रेशीम उत्पादनात १९१४ शेतकºयांचा सहभाग असून, जवळपास २ हजार ४२ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. वेळेवर अंडीपुंज मिळत नसल्यामुळे दोन ते तीन लॉट शेतकºयांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यानंतर वेळोवेळी मागणी करुन देखील अंडीपुंज मिळत नसल्यामुळे उत्पादन घेता येत नाही. तसेच पाणीटंचाईमुळे तुतीच्या झाडांवर देखील परिणाम होऊ लागला आहे.तसेच मागील दहा वर्षापासून रेशीम कोषाच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ न झाल्यामुळे शेतकºयांना योग्य मोबदला मिळत नाही याचा देखील शासनाने विचार करावा. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकºयांना देखील रेशीम कोषाला १०० रुपये प्रति किलो प्रोहोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच चॉकी सेंटरसाठी १५०० रुपये अनुदान देण्यात यावे. ज्या शेतकºयांनी मागील वर्षी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाचा आवश्यकता आहे. मात्र, रेशीम अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांकडून योग्य मार्गदर्शन व वागणूक दिली जात नसल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांवर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.योग्य नियोजनानंतरच राबवावे ‘महारेशीम’जिल्ह्यातील २ हजार एकर क्षेत्रावर असलेल्या लागवडीसाठी वेळेवर अंडीपुंज पुरवठा केला जात नाही. मात्र, २० हजार हेक्टर क्षेत्रावर तुती लागवड करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने महारेशीम अभियान राबवले जाणार आहे. मात्र नियोजन योग्यरित्या करुनच हेअभियान राबविल्यास सुरुवातीपासून उत्पादन घेणाºया शेतकºयांचे नुकसान होणार नाही.जिल्ह्यातील रेशीम उत्पादन२०४२ एकर क्षेत्रावर लागवड१९१४ शेतकºयांचा सहभाग६ लॉटमधून घेतले जाते उत्पादन४५ दिवसांनी एक लॉटसरासरी उत्पादन १ ते ३ लाख रु.दरवर्षी मजूरीपोटी मिळतात एकरी १ लाख १५ हजार रुपये
रेशीम उत्पादकांचे बीडमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:04 AM
आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
ठळक मुद्देअंडीपुंजचा तुटवडा : रेशीम उत्पादनात १९१४ शेतकऱ्यांचा सहभाग मात्र अडचणींत वाढ