बीड - भाजपा नेत्या पकंजा मुंडेंचा दसरा मेळावा म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींसह भावनिकेचा सोहळा असतो. या सोहळ्या मुंडें कुटुंबीयांसह गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची सावरघाट येथे गर्दी जमते. केवळ मुंडे कुटुंबीयांवरील प्रेमापोटी ऊसतोड कामगार, मजूरांसंह लाखो अनुयायी सोहळ्याला उपस्थित राहतात. मात्र, कोरोनामुळे यंदाचा हा सोहळा अतिशय मोजक्या लोकांमध्येच पार पडला. विशेष म्हणजे या सोहळ्या पंकजा यांच्यासह प्रितम मुंडेची मोठी रॅली असते. पण, प्रितम मुंडेंनाही यंदा दसरा मेळाव्याला हजर राहता आले नाही.
पंकजा मुंडेंनी ऑनलाईन दसरा मेळाव्यामुळे खंत व्यक्त केली, पण पुढील वर्षी मोठ्या गर्दीचा, गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण भरवू, एकदिवस शिवाजी पार्कवरही मेळावा घ्यायचाय असं पंकजा यांनी म्हटलं. यावेळी बोलताना खासदार प्रितम मुंडेंच्या गैरहजेरीबद्दल सांगताना, त्यांची कोरोना चाचणी केल्याने त्या येथे आल्या नसल्याचंही पंकजा म्हणाल्या.
प्रितम मुंडे आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. प्रितमताईंना ताप आलाय, घसात कफ झालाय, काय झालंय माहिती नाही. प्रितमताईंनी कोरोनाची चाचणी केलीय. म्हणून त्या आज इथं आल्या नाहीत, असं पंकजा यांनी सांगितलं. तसेच, दरवर्षी प्रितमताईंची रॅली असते अन् मी हेलिकॉप्टरने येत असते. पण, आज माझा एक हात मोडल्यासारखं मला वाटतंय. आज प्रतिमताई इथं नाहीत, पण आपण ठरवल्याप्रमाणे त्याही ऑनलाईन आपला मेळावा पाहत असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वजण हा दसरा मेळावा पाहत असल्यचंही त्यांनी म्हटलं.
एकदिवस शिवतिर्थावर दसरा मेळावा घेणार
यंदा दरवर्षीप्रमाणे मेळावा होऊ शकला नाही, पण आपल्या मेळाव्याची एक वेगळीच शक्ती आहे. पुढच्यावर्षी आपण याचेही रेकॉर्ड मोडू, एकदा आपल्याला शिवाजी पार्कसुद्ध भरवायचंय. मुंढेसाहेब जिल्हा परिषदलाही उभे नव्हते. भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, असं स्वप्नातही वाटत नव्हतं, त्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी भाजपात राजकीय जीवनाची सुरुवात केली. तेव्हा, शिवाजी पार्कमध्ये बसलेल्या मुंडेसाहेबांनी म्हटलं होतं. एक दिवस मी या शिवाजी पार्कवर सभा घेईन. म्हणून आज मी सांगते, एक दिवस शिवतिर्थावर दसरा मेळावा घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असे पंकजा यांनी म्हटले.