शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 4:18 PM

आज सकाळी बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.

बीड: आज सकाळी बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडललेले आढळले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणी यांच्या मृतदेहाशेजारी, त्यांची बंदूक आढळली. दरम्यान, भगीरथ यांच्या मृत्यूची बातमी कळताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. यावेळी आपल्या एका जवळच्या कार्यकर्त्याचा मृतदेह पाहून प्रीतम यांना गहिवरुन आले. 

प्रीतम मुंडे यांनी भगीरथ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

भगीरथ बियाणी भाजपचे अंत्यत निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी कुटुंबासोबत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झोपले. सकाळी त्यांच्या खोलीत पाहिले तर बियाणी रक्ताच्या थारोळ्यात आढळले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्येमागचे कारण काय? याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रीतम मुंडे रुग्णालयात बियाणी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचल्या. मात्र मृतदेह पाहूनच त्या अस्वस्थ झाल्या. त्यांना गहिवरुनही आले. यावेळी प्रितम यांनी बियाणींच्या कुटुंबाला आधार दिला. जवळच्या कार्यकर्त्याच्या अशा निधनानंतर प्रितम मुंडे यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा