शिरूर कासार : शिरूर येथील कोरोना केअर सेंटरला खा. डाॅ . प्रीतम मुंडे यांनी गुरूवारी भेट दिली. यावेळी प्राधान्याने त्यांनी महिला रूग्णांबरोबर संवाद साधत त्यांना धीर दिला. तुम्हाला काही कमी पडू देणार नाही ,घाबरू नका आम्ही सर्व तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सेंटरमधील सर्व बाबींची चौकशी केली. डाॅक्टर वेळेवर येतात का ? जेवण, नाष्टा चांगला मिळतो का ? अशी विचारपूस केली. कुठलीही तक्रार नसल्याचे रूग्णांनी सांगितले. येथील सोईसुविधा चांगल्या असल्याचा अभिप्राय देत मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार श्रीराम बेंडे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी,नोडल ऑफिसर डॉ. संतोष शहाणे ,नायब तहसीलदार किशोर सानप , डॉ .अंजली बारगजे उपस्थित होते. तहसीलदार बेंडे यांनी तालुक्याबाबत आढावा मांडला. तर डॉ. गवळी यांनी सद्यपरिस्थितीची माहिती दिली. कोरोनामुळे सर्वच हतबल झालेले आहेत. आरोग्य विभागावर ताण वाढतो आहे. प्रशासनावर देखील भार आहेच. मात्र आपण सर्वांनी या प्रसंगाला न घाबरता सामोरे गेले पाहिजे. रूग्णांना कुठेही कमतरता पडू नये याची प्रकर्षाने काळजी घेण्याचे खा. मुंडे यांनी आवाहन केले.
पाटोदा सीसीसीची पाहणी
खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी पाटोदा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांशी थेट संवाद साधला. तसेच यावेळी रुग्णांना दिले जाणाऱ्या भोजनाची किचन शेडमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली केली. ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ. राऊत, कोविड सेंटरचे डॉ. राजपुरे, तहसीलदार रमेश मुंडलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तांदळे यांना सूचना दिल्या.
फोटो ओळी : शिरूर कासार येथील कोविड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
===Photopath===
170421\17bed_1_17042021_14.jpg