शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

महावितरणचे कार्यालय, अधिकारी दाखवा एक हजार रुपये मिळवा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:33 AM

चार वर्षानंतर प्रथमच मांजरा धरण भरले असून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ऊस लागवड मोठ्याप्रमाणात केली आहे. परंतु ...

चार वर्षानंतर प्रथमच मांजरा धरण भरले असून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ऊस लागवड मोठ्याप्रमाणात केली आहे. परंतु देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला याप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. महावितरण कंपनीने मार्च एन्डची वसुली तीव्र केल्यामुळे व डी.पी. बंद केल्यामुळे कॅनाॅलला पाणी असून ते शेतकऱ्यांना देता येत नसल्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. पाटोदा म. शाखा अभियंता कार्यालयांतर्गत एकूण १५ गावे येतात. परंतु काही मोजक्याच गावांमध्ये वसुलीचा घाट लावल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलेले जात आहे. तसेच पाटोदा म. येथील शाखा अभियंता कार्यालय हे गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांकडील बिलाची थकबाकी वाढल्याचे शेतकरी सांगतात. या संदर्भात कार्यकारी अभियंता चाटे यांच्याशी संपर्क साधला असता. अंबाजागाई तालुक्यात एरूण ९ अभियंता शाखा कार्यालय आहेत. त्यापैकी ७ कार्यालय हे ग्रामीण भागात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु पाटोदा म. येथील शाखा अभियंता कार्यालय बंद असल्याचे मला आज माहीत झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथे कोण अभियंता नियुक्त आहे, हे देखील त्यांना सांगता आले नाही ही खेदाची बाब असल्याचे सरपंच आनंद देशमुख,उपसरपंच गोविंद जामदार, शेतकरी नवनाथ गाडवे, धनराज पन्हाळे म्हणाले त्यामुळे गावात महावितरणचे शाखा अभियंता कार्यालय दाखवा एक हजार रुपये मिळवा, असे जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.