: शहरातील शाहुुुनगर भागातील नागरिकांनी जास्त बांंधकाम केल्याने नागरिकांना याचा त्रास होत होत असल्याने नगर पालिकेने गुरुवारी या भागातील बांधकामावर हातोडा फिरवला.
शाहुनगर भागात अनेकांनी आपल्या बांधकामापेक्षा जास्त बांधकाम करत असताना याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शेजारी शेजाऱ्यांमध्ये भांडण होत असत. यामुळे नगर पालिकेकडे एकमेकांविरुद्ध तक्रारी देण्याचा सपाटा सुरू होता.
या तक्रारींंची दखल घेत नगर परिषदेने नगर परिषद अधिनियम १९६५चे कलम १७९ अन्वये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. मुख्याधिकारी विशाल भोसले, अतिक्रमण विभागप्रमुख इंजि. आशिष तुसे यांच्यासोबत इंजि. जगदीश जाधवर, अधीक्षक गणेश डोंगरे व नप कर्मचारी संतोष घाडगे, विलेश कांबळे, संकेत साळवे, सागर उजगरे यांनी ही मोहीम राबविली. आज माजलगाव नगर परिषदेत सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांना शहरातील बांधकाम परवान्यांबाबतदेखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. नगरपरिषदेने शाहुनगर भागातील अतिक्रमण हटवले तसे अतिक्रमण शहरातील अन्य भागात हटवण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.