ज्ञानदेव आश्रुबा खटके (४२) हे दोन वर्षांपासून वडिलोपार्जित स्वस्त धान्य दुकान चालवत असत. दुकानाच्या मालकी हक्कावरुन मोठा भाऊ लक्ष्मण आश्रुबा खटके याने सात जणांच्या मदतीने ३० ऑगस्ट रोजी ज्ञानदेव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यात ज्ञानदेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान १ सप्टेंंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा नोंद आहे. यातील लक्ष्मण खटके , बाळासाहेब खटके व भागीनाथ लकडे यांना २ सप्टेंबर रोजी अंभोरा पोलिसांनी अटक केली. भागीनाथच्या पायाला मारहाणीत जखम झाली होती. त्यामुळे त्यास शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले तर लक्ष्मण व बाळासाहेब यांना आष्टी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य पाच आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक रोहित बेंबरे यांनी सांगितले.
खून प्रकरण, दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:35 AM