शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सामाईक ढोलकीच्या वादातून कलावंताचा खून, आठ आरोपींना जन्मठेप

By अनिल भंडारी | Published: September 11, 2023 7:20 PM

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : गेवराईच्या इरगावातील घटना

बीड : सामाईक ढोलकीच्या वादातून एकाचा खून तसेच एकास जखमी केल्याप्रकरणी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या-४ आर. एस. पाटील यांच्या न्यायालयाने सुनावली. एकाच प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा हे अलिकडच्या काळातील बहुधा पहिले प्रकरण असावे.

गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम भाऊ माळी व आरोपी यांच्यात सामाईक ढोलकी होती. नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी २ ऑक्टोबर २०१४ रोजी तुकाराम यांनी धर्मराज माळी याच्या घरून ही ढोलकी आणली होती. या वादातून ३ ऑक्टोबर २०१४ रोजी  एकाने बाभळीच्या लाकडाने तुकारामच्या डोक्यात, मानेवर, कमरेवर मारले. त्यामुळे तुकाराम बेशुुध्द पडला. त्यावेळी तुकारामचा मुलगा धावून आला असता त्याला काठीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. दरम्यान उपचारासाठी नेताना तुकारामचा मृत्यू झाला. याप्रकरणी एएसआय ए. डी. सांगळे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणात फिर्यादी, जखमी साक्षीदार, प्रत्यदर्शी साक्षीदार, इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुराव्यांचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व अति. सत्र न्या. आर. एस. पाटील यांनी आठ आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावास तसेच कलम ३२४ प्रमाणे प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास तसेच कलम १४८ भादंविनुसार ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. महादेव लक्ष्मण पवार, बाळू उत्तम माळी, बाळू लक्ष्मण पवार, भागवत सखाराम माळी, भीमा उत्तम माळी, धर्मराज उत्तम माळी, बबन उत्तम माळी, येणूबाई लक्ष्मण पवार सर्व रा. इरगाव ता. गेवराई. यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड