येथील नगर पंचायत प्रांगणात शुक्रवारी सकाळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सामूहिक शपथविधी सोहळा संपन्न झाला. या अभियानांतर्गत निसर्गाशी निगडित असलेल्या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वाला पोषक अशी वागणूक आपण केली पाहिजे. त्याचबरोबर भारत मातेला, वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेल, पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेईल, जास्तीत जास्त झाडांची लागवड व संगोपन करून या देशाला, वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त ठेवेल, अशा स्वरूपाची शपथ प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिली व घेतली.
शपथ वाचन ज्योती सातपुते यांनी केले. यावेळी प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, डॉ. भगवान सानप, भीमराव गायकवाड, गणेश भांडेकर, सुनील शिंदे, नशीर शेख, माजी सैनिक अशोक गिरी, प्रकाश खारोडेसह लेखापाल दामोधर, सागर कुंभार आदी कर्मचारी उपस्थित होते. किशोर सानप यांनी मार्गदर्शन केले. त्यात कचरा विघटन, सांडपाणी नियोजन तसेच स्वच्छता याबाबत विस्तृत माहिती सांगितली.