लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरात अनेक ठिकाणी नाली बांधकाम करण्यात येत आहे. त्यात अनेक ठिकाणच्या नाल्यांचे काम अतिशय निकृष्ट होत आहे. श्रीकृष्णनगर भागात बनविण्यात आलेल्या नाल्या अरुंद झाल्या आहेत. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत नागरिकांनीही तक्रारी केल्या आहेत.
माजलगाव नगरपालिकेने स्वतःच्या कामावर विश्वास नसल्यामुळे २२ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. सध्या शहरातील सर्व प्रभागांमध्ये नाली व रस्त्याची कामे त्यातून सुरू आहेत. नाली व रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. याकडे ना नगरपालिकेचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे. त्यामुळे बोलायचे कुणाला? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. संबंधित गुत्तेदार नगरसेवकाचेच ऐकत नसेल, तर नागरिकांचे काय ऐकणार. कोणीच काही बोलायला तयार नसल्यामुळे गुत्तेदाराने बोगस कामाचा सपाटाच सुरू केला आहे.
शहरातील श्रीकृष्णनगर भागात १७० मीटर नाल्याचे बांधकाम केले. दुसरीकडे या नाल्याची रुंदी कमीत कमी दोन फुटाची आहे. संबंधित गुत्तेदाराने या नालीची एक फुटापेक्षाही कमी रूंदी ठेवली आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी नाली बांधकाम थांबवले आहे.
....
श्रीकृष्णनगर भागात नाली बांधकाम सुरू असतानाही नगरपालिकेच्या अभियंत्यास याबाबत माहिती नाही. याबाबत संबंधित अभियंते काहीच बोलण्यास तयार नाहीत. संबंधित गुत्तेदाराला या नाली बांधकामाचे अदयाप बिल दिलेले नाही. त्याने जी नाली केली आहे, ती तोडून त्यास पुन्हा नाली करण्यास सांगण्यात येईल.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष, माजलगाव.
===Photopath===
070621\img_20210529_124517_14.jpg~070621\img_20210529_124434_14.jpg
===Caption===
माजलगाव शहरातील श्रीकृष्ण नगर भागात बनविण्यात आलेल्या अरुंद नाल्या.