शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

वॉटर कप जिंकण्यासाठी नाळवंडीकरांनी आवळली श्रमदानाची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:09 AM

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : दुष्काळमुक्तीसाठी आबालवृद्धांसह हजारो हात सरसावले; दररोज सायंकाळी ग्रामस्थ करतात साडेतीन तास श्रमदान

बीड : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत. अशा परिस्थितीत नाळवंडीकरांनी श्रमदानाची वज्रमूठ करीत सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्याचा संकल्प केला असून १६ दिवसांपासून श्रमदान सुरु आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन लाभले आणि गावाची दिशाच बदलली. उप मुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ. सुनिल भोकरे, चंद्रशेखर केकाण, मधुकर वासनिक आदि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साथ दिली. गावाने योग्य कामाकडे आगेकूच केली. बघता बघता गावाच्या एकीतून स्मार्ट तालुक्याचा प्रथम किताबही पटकावला. दुष्काळाच्या असह्य झळा गाव सहन करत आहे.ही दुर्दैवी बाब गावातील युवकांच्या लक्षात आली. पाणी फाऊंडेशनची स्पर्धा ही संधी समजून गावाने सहभागी होण्याचा निर्धार केला.पाण्यासाठी गाव एकवटले.४८०० लोकसंख्येच्या नाळवंडीने दुष्काळमुक्तीच्या लढ्यात भाग घेतला. श्रमदानातून जलसंधारणाची व मनसंधारणाची कामे सुरू झाली. रात्रंदिवस शेकडो महिला, युवक, वयोवृद्ध घामाच्या धारा गाळून नाळवंडी दुष्काळ मुक्त, टँकरमुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिनगारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मिसाळ, डॉ.आबुज, मुख्याध्यापक घुमरे, मारोती नगर येथील तांड्यावरील बंजारा समाजाकडून श्रमदान करण्यात आले. शेकडो बंजारा बांधव, महिलांनी श्रमदान करून नाळवंडी दुष्काळ मुक्त करण्यासाठी साथ दिली आहे.बांधबंदिस्ती, अनघड दगडांचा बांधबांधबंदिस्ती, अनघड दगडी बांध, चर खोदणे, जुन्या बंधाºयांची दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येत आहे.मौजवाडी, जरुड आणि नाळवंडी येथील नद्यांचा संगम येथे आहे. त्या आटल्या आहेत. त्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. शोषखड्डे खोदले आहेत. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले जात आहेत.मानवलोकसह विविध सामाजिक संस्था, अधिकारी, ग्रामस्थ विविध माध्यमातून या कामी मदत करत आहेत. राज्याचे प्रथम बक्षीस जिकंण्याचा निर्धार नाळवंडीकरांनी केला आहे.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा